Posts

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ९

 पाठलाग (मराठी भयकथा) भाग ९ आकाशला जिवंत बघून जयेश आणि चंदू जरी खुश झाले पण त्याला वाचविणं तितकंच अवघड होतं. आजू बाजूला रात्रीचा काळकभिन्न अंधार होता,त्यात त्या महालाच्या काळ्या पाषाणातल्या उंच उंच पण छत नसलेल्या दगडी भिंती अजस्त्र राक्षसांसारख्या भासत होत्या. या भिंतीच्या भुलभुलैय्या मध्ये खूप आतवर ते धन असलेलं दालन होतं आणि तिथेच सगळे जमून आता आज शेवटचा प्रयोग करणार होते आणि हे नाट्य संपणार होतं. नियतीचा खेळ कसला अजीब होता गेल्या दशकात जे साधू आणि वसंत मिळून करू शकले नाहीत ते वसंताच्या मुलांनी आणि जावयाने काही महिन्यातच करून दाखवलं. आज त्यांनी उरलेले सात जण जमवले होते आणि योजनाबद्ध रित्या धन नेण्यासाठी मोठं वाहन लागेल म्हणून बस सुद्धा घेऊन आले होते. साधू खूप आनंदित होता त्याच्या प्रमाणेच वसंत आणि त्याचा परिवार सुद्धा आनंदी होता कारण आजपासून त्यांचं नशीब बदलणार होतं. अंधारात अक्षय आणि मोन्या ने मशाली पेटवल्या आणि तिथे धगधगता उजेड झाला. तिथे आधी येऊन साधूने पिशचांना आधीच जागृत केलेलं होतं त्यामुळे आत पुढचे सोपस्कार पार पडायचे होते. वसंत आणि साधूने आकाशला एक कोपऱ्यातून बाहेर

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ८

 पाठलाग (मराठी भयकथा) भाग ८ केतनचा मामा, वसंत त्याचं नाव होतं. त्याच्या आणि साधू मध्ये धनाविषयी तडजोड झाली आणि त्यांनी दोघांनी मिळून ते धन काढायचं ठरवलं अर्धा अर्धा हिस्सा दोघे वाटून घेणार होते बारा रांजण पैकी सहा वसंत म्हणजे केतनच्या मामा ला आणि सहा त्या साधू ला अशी वाटणी आधीच ठरली होती. आता त्यांना पुढच्या कामाच्या तयारीला लागायचं होतं १२ वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी त्यांना मिळालेला होता पण म्हणून पूर्ण बारा वर्ष ते त्यात घालवणार नव्हते. पोलिसांना चुकवून आणि जगाला फसवून बारा जण गायब करायचे त्यातही सहा तरुण अविवाहित मुली म्हणजे मोठं अवघड काम होतं. इथे एखाद्या गुन्हेगाराने एखादा खून केला तर तो पचवायला त्याला दहा वीस वर्ष परागंदा व्हावं लागतं तरीही सापडला तर फाशी किंवा जन्मठेप . अशावेळी त्याठिकाणी १२ जणांना गायब करणं म्हणजे सोपं काम नव्हतं. पण दोघांनी ते काम सुरु केलं. त्यांनी त्यांच्या लढाईची पहिली पायरी गाठली, पहिल्या खेपेस त्यांनी एक मुलगा तरुण व्यापारी मुलगा जमीन विकण्याच्या बहाण्याने पळवून देखील आणला त्याला हात पाय बांधून त्या जंगलात घेऊन गेले हि त्यांची चाचणी होती.

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ७

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ७  जयेश आणि चंदू ला जोडीला दिलीप मिळाल्यामुळे जरा धीर मिळाला होता. फार्म हाऊस मधून येणाऱ्या किंचाळण्याच्या आवाजांमुळे आता तिघेही थोडे घाबरले होते पण त्यांना त्या तीन मुलांना वाचवायचं होतंच . त्यामुळे ते गवतातून झुडुपांमधून तिकडे लपत छपत जाऊ लागले. अर्धा रस्ता ओलांडला. थोड्याच अंतरावर फार्म हाऊस च कुंपण होतं, ते कुंपण ओलांडून आत शिरले तेव्हा मात्र आरडा ओरडा बंद झालेला होता फक्त काहीतरी धूस फूस जाणवत होती. तिघेही गुपचूप हॉल च्या खिडकीजवळ आले जयेशने दिलीप ला इशार्यानेच पाठीमागे कोणी येईल म्हणून लक्ष ठेवायला सांगितले . फार्म हाऊस चा हॉल चा पोर्चमध्ये जाणार मुख्य दरवाजा उघडा होता त्यामुळे कोणी बाहेर आलं तर या तिघांना सहज बघू शकत होता यांना मदत होती ती फक्त अंधाराची. जयेशने आधी खिडकीच्या बाजूने मध्ये डोकावून पाहिलं मध्ये पाच सहा जण उभे दिसत होते.पण बाकीचे सहाजण काही दिसत नव्हते जयेश खिडकीच्या आणखी जवळ आला तर त्याला दिसलं खाली गुळगुळीत फरशीवर हात, पाय आणि तोंड बांधून पडलेले विनीत, राहुल आणि दिगू नानाचा भाचा केतन हे तिघे आणि त्यांच्याच बाजूला त्याच मुलींमध

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ६

 पाठलाग (मराठी भयकथा) भाग ६ तालुक्याला येऊन ट्रेन मध्ये बसल्यावर जयेशने आकाशच्या भावाला फोन केला.  "हॅलो, मी जयेश बोलतोय" "हो दादा बोल" आकाशचा भाऊ तिकडून बोलला. "अरे आकाशचा फोन लागत नाहीये तो गावाकडे आलाय का ?" " नाही दादा मी पण आजच फोन केला होता पण त्याने उचलला नाही मला वाटलं कामात असेल म्हणून मी परत केला नाही" "बर तू याआधी केव्हा फोन केला होतास त्याला ?" "चार दिवसांपूर्वी आमचं बोलणं झालं आणि मध्यंतरी मला देखील फोन करायला जमलं नाही " "बर ठीक आहे, म्हणजे तो शहरातच आहे गावाकडे नाहीये ओके ओके मी रूम वर जाऊन भेटतो त्याला" "हो दादा चालेल" "बर चल ठेवतो फोन बाय" एवढं बोलून जयेशने फोन कट केला. धडधडत धावनाऱ्या ट्रेनमध्ये चंदू जयेशच्या तोंडाकडे बघत होता. आता पुढे काय हा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर होता. ट्रेनमधल्या सीट वर नीट बसत जयेश पुढे चंदूला बोलू लागला, " चंदू, आकाशच्या घरी त्याच्या विषयी काहीच माहिती नाहीये." "म्हणजे आकाश चा खून झाला हे त्यांना कळलं नाही अजून ? कसं शक्य आहे?" "