Posts

पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५

  पाठलाग (मराठी भयकथा) भाग ५ जयेश आणि चंदू ला वाटलं कि आपण केतन ला आणि त्याच्या मित्रांना आपल्याच गावात पकडलं पण ती मुलं वेगळीच निघाली. काय होतंय ? काय घडतंय ? जे दिसतं ते खरं कि जे आपण अनुभवलं ते खरं ? या विचारात जयेश आणि चंदू दोघेही हरवले होते. ते दिगुनानाच्या आवाजाने भानावर आले. "आरं पोरांनो जेवून घ्या तुम्हीपण आज हिथच ह्ये पोरं आज शेतात न्हाय जाणार ते रातच्यालाच शहराला चाललेत मग मित्र-मित्र तुमि सोबतच जेवा आता " "नाही नको नाना आई ने स्वयंपाक बनवून ठेवला असेल ती पण वाट बघत असेल" जयेश बोलला . "आर असू दे कि मग काय झालं " दिगुनाना. "बरं थांबा मी आईला फोन करून सांगतो" जयेश ने मोबाइलला वरून दोन गल्ल्या पलीकडे असलेल्या स्वतःच्या घरी आई ला फोन लावला. तो पर्यंत चंदू त्या मुलांशी गप्पा मारायला लागला होता कारण त्याला जयेशच्या डोक्यात काय चाललं आहे ते कळलं होतं नाहीतर जयेश उगाच इतक्या लवकर जेवायला तयार नसता झाला. एकमेकांना इतके चांगले ओळखत होते म्हणून तर ते इतके चांगले मित्र झाले होते. चंदू त्या मुलांची माहिती काढू लागला. तोपर्यंत जयेशचा फोनदेखी...

पाठलाग (मराठी भयकथा) भाग 4

  पाठलाग (मराठी भयकथा) भाग 4 आकाश चा खून झाल्याचं कळल्यानंतर जयेश शहरात आला आणि तिथून त्याने स्वतःला वाचविण्यासाठी आपल्या गावी काही दिवस जाण्याचा निर्णय घेतला आणि तो ताबडतोब संध्याकाळची ट्रेन पकडून गावाकडे निघाला या दरम्यान त्याला घडलेल्या सर्व घटना विचित्र वाटत होत्या, गावाच्या शिवारात ट्रेन थांबल्यामुळे तो तिथेच उतरून गावकडे पायी निघाला पण वाटेत त्याला तीच बस पुन्हा दिसली त्यामुळे त्याला आपला पाठलाग होतोय अस वाटलं आणि सुरक्षिततेसाठी तो रस्त्याने न जाता शेतांमधून पिकांमधून रस्ता काढत गावाकडे निघाला. "आता मी काय करू?, गावात जाऊ कि नको ?' शेतात पिकांमधुन चालताना जयेश विचार करत होता. कुठून हि ब्याद मागे लागली असं झालं होत. मुख्य रस्त्याने न जात सुरक्षिततेसाठी जयेश शेतांमधून चालत जात होता. इथून पुढे थोड्याच अंतरावर त्याची देखील शेती होती, तिला बघत त्यातच काम करत तो लहानाचा मोठा झालेला होता. त्याने विचार केला मी जर आता घरी गेली तर हे लोक माझ्या घरापर्यंत सुद्धा पोचतील त्यापेक्षा मी इथेच थांबून या बस चा मागोवा घेतला तर ?. असा विचार करून तो तडक त्याच्या शेताकडे निघाला ...

पाठलाग (मराठी भयकथा) भाग 3

  पाठलाग (मराठी भयकथा) भाग 3 आकाश चा खून झाल्याचं कळल्यानंतर जयेशला मोठा धक्का बसला होता, त्याला इतकं कळलं कि आकाश ला मारल्यानंतर हे लोक आता आपला पाठलाग नक्कीच करतील, कारण त्यांना सगळ्यांना आपण पाहिलं आहे आणि त्यांना आपल्यला मारायचं होत पण आपण त्यातून निसटलो. आता यांच्यापासून वाचायचं तर एकच पर्याय आहे तो म्हणजे शहर सोडून आपल्या १५० किमी अंतरावर असलेल्या गावाकडे पळून जाणं. हायवे असल्यामुळे नवली फाट्यावरून शहराकडे वेगवेगळ्या गाड्या भरधाव धावत होत्या. तो परत बस स्टॅन्ड मध्ये जाऊन शहराकडे जाणारी बस शोधू लागला सुदैवाने एक बस निघायच्या बेतात होती जयेश धावतच जाऊन त्या बस मध्ये बसला. खिडकीतून तो बाहेर कोणाला तरी शोधत होता, कदाचित त्याला असं वाटत होत कि त्या मुलामुलींपैकी कोणी त्याला शोधत तर नसेल ना ? त्यांनी बस स्टॅन्ड मध्ये येण्याआधी हि बस निघायला हवी हा विचार सारखा त्याला येत होता. घामाघूम झालेला जयेश बस मध्ये बसल्यावर अजिबात स्थिर नव्हता. या गडबडीतच कंडक्टर ने बेल मारली तसं ड्रॉयव्हरने आधीच चालू करून ठेवलेलं इंजिन ला गियर मध्ये टाकलं व हळू हळू बस पुढं सरकू लागली. घुर्र्र्र ...

पाठलाग (मराठी भयकथा) भाग २

 काळ्या ढगांनी आभाळ व्यापलं होत, आणि त्यांचं वरून पाणी ओतण्याचं काम अव्याहत चालू होतं. त्याचवेळी किंचित अंधारून देखील आलं होतं. ज्या प्रमाणे काळे ढग पाऊस पडण्याआधी जमा होऊन लवकरच येऊ घातलेल्या पावसाची पूर्वसूचना देतात, त्याच प्रमाणे माणसांना देखील येणाऱ्या संकटांची चाहूल कळत गेली तर किती बरं होईल सगळे आधीच संकटाशी दोन हात करायला तरी तयार होतील किंवा इतर मार्ग तरी शोधतील पण दुर्दैवाने तसं होत नाही. ढगांनी आता आणखी जोराने आभाळातून धरणीवर पाणी ओतायला सुरुवात केली होती. जणू काही ढग कोणावर राग काढत आहेत असा पाऊस कोसळत होता. हा पाऊस कोणासाठी रम्य, कोणासाठी उपयोगी , तर कोणासाठी त्रासदायक होता. एव्हाना बस शहरापासून बर्यापैकी लांब आणि आता आसरी घाटाच्या अलीकडे आली होती. बसमध्ये बसलेले सर्वजण मात्र या पावसाने खुश झाले. अजून त्यांच्या ट्रिप च्या ठिकाणी पोहोचायला खूप अवकाश होता, आधी आसरी घाट ओलांडायचा मग पुढे गेल्यावर नवली फाटा मग तिथून उजवीकडे वळून ४ किलोमीटर वर नवली गाव आणि त्याच रस्त्याने पुढे चाळीस किलोमीटर वर धबधबे, बॅकवॉटर्स , डोंगरा...

पाठलाग भाग 1 (मराठी भयकथा )

  पाठलाग भाग 1 (मराठी भयकथा ) मराठी थरारक कथा सकाळ टळून आता उन्हाची किरणं तापायला लागली होती , धो धो कोसळणारा पाऊस थांबला होता . आसरी घाटातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग घाटातल्या त्या दाट झाडींमधून एखाद्या काळ्या चपळ सापासारखा धावत गेलेला दिसत होता . हिरव्यागार झाडींमध्ये आणि दोन्हीबाजूला लांबवर असलेल्या उंच उंच टेकड्या आणि हलक्या हलक्या धुक्यामुळे तो खूप मनमोहक भासू लागला . झाडांमधील पक्षी किलबिल करत या झाडांवरून त्या झाडांवर फिरत होते . याच सर्व मनमोहक वातावरणातून एक खाजगी बस महामार्गांवरुन धावत चालली होती . बाहेरील घाटाचं वातावरण मनमोहक असलं तरी बसमधील वातावरण तसं नव्हतं . आकाश , जयेश , आणि आणि चंद्रकांत म्हणजेच चंदू हे तिघेही मित्र काहीसे भयभीत आणि चिंताग्रस्त अवस्थेत त्या बस मध्ये बसलेले होते . त्यांच्यासोबत त्या बसमध्ये अजून सहा बायका आणि तीन पुरुष होते सगळे तरुणच होते . पण भयभीत झालेले फक्त हे तिघेच होते . " साला कुठून बुद्धी सुचली आणि ह्या आक्याच्या न...